जळगावच्या विवाहितेचा पाच लाखांसाठी छळ
पतीसह नऊ जणांविरोधात शनी पेठ पोलिसात गुन्हा दाखल
जळगाव : शहरातील कोळीपेठ येथील माहेर असलेल्या विवाहितेने प्लॉट घेण्यासाठी माहेरहून 5 लाख रूपये आणावे यासाठी शिवीगाळ व मारहाण करणार्या पतीसह नऊ जणांविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नऊ संशयीतांविरोधात गुन्हा
रीजवाना सज्जाद हुसेन कुरेशी (32, रा.खडकीवाडा, कोळीपेठ, जुने जळगाव) यांचा विवाह 2007 मध्ये सज्जाद हुसेन समशोद्दीन कुरेशी (रा.नायता, जि.इंदौर, मध्यप्रदेश) यांच्याशी रीतीरीवाजानुसार झाला. लग्नाचे सुरूवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पती सज्जाद हुसेन कुरेशी याने विवाहितेला लहान लहान गोष्टींवर शिविगाळ करणे, टोमणे मारणे सुरू केले. त्यानंतर पती सज्जाद कुरेशी याने प्लॉट घेण्यासाठी विवाहितेला माहेरहून 5 लाख रूपये आणावे यासाठी तगादा लावला परंतु आई-वडीलांची परीस्थिती हालाखीची असल्याने पैश्यांची पुर्तता करून शकत नव्हते. यासाठी सासू, नणंद, सासरे, जेठ, दीर यांनी देखील छळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा छळ सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्यात. याबाबत विवाहितेने शनीपेठ पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शनीपेठ पोलिस ठाण्यात पती सज्जाद हुसेन समशोद्दीन कुरेशी, सासू सकीनाबी समशोद्दीन कुरेशी, जेठ एजाजुद्दीन कुरेशी, दीर शब्बीर कुरेशी, अली अहमद कुरेशी, अमीर हमजा कुरेशी, अबरार अहमद कुरेशी, नणंद हिना कौसर कुरेशी, सलमा कुरेशी (सर्व रा. मुण्डता, नायता, इंदौर, मध्यप्रदेश) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक यशोदा कणसे करीत आहे.





