जळगावच्या मालधक्का गोदामात चोरीच्या प्रयत्नातील दोघे जाळ्यात
भुसावळ : जळगाव रेल्वे स्टेशनाजवळील मालधक्का गोदाम परीसरात आऊटरवर चोरीच्या उद्देशाने लपून असलेल्या दोघांच्या आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांनी मंगळवार, 7 रोजी मुसक्या आवळल्या आहेत. सलीम खान कबीर खान (32, गेंदालाल मिल, जळगाव) व जुबेर शेख भिकन शेख उर्फ डबल भेजा (21, सुरेश दादानगर, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. लोहमार्गचे हवालदार सचिन भावसार, रामराव इंगळे व आरपीएफ उपनिरीक्षक मोहितकुमार, आरक्षक परीक्षीत वानखेडे, महेंद्र कुशवाह यांनी ही कारवाई केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. ही कारवाई औरंगाबाद लोहमार्गच्या पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, विभागीय सुरक्षा आयुक्त क्षितीतज गुरव, लोहमार्गचे पोलिस निरीक्षक विजय घेरडे, आरपीएफ निरीक्षक राधाकिसन मीना आदींच्या पथकाने केली.


