चाळीसगावात जुन्या वादातून दोघांना फायटरने मारहाण : आठ संशयीतांविरोधात गुन्हा


चाळीसगाव : जुन्या वादातून दोघांना लोखंडी फायटरने मारहाण करून गळ्यातील सोन्याची चैन व 15 हजार रुपयांची रोकड हिसकावून नेल्याची घटना शहरातील कन्नड रोडवर घडली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

जुन्या भांडणातून घटना
राजू पुंडलिक कुमावर (43, घाट रोड, चाळीसगाव) हा आपल्या नातेवाईकांसह कार घेवून जेवणाचे पार्सल घेण्यासाठी चाळीसगाव कन्नड रोडवरील रस्त्यावर गेला असता जुन्या भांडणाच्या कारणावरून कृष्णा गायकवाड, अमोल गायकवाड, अभ्या गोल्हार, भुप्या सोनवणे, सचिन गायकवाड, अमळनेरचा दाऊत देशमुख, रोहन भोसले, संजय गांधी नगरच्या पावट्या आणि इतर जणांनी राजू कुमावत याला बेदम मारहाण केली आणि गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून घेतली तसेच कारचे मोठे नुकसान केले. या प्रकरणी राजू कुमावर याच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहा.निरीक्षक दीपक बिरारी करीत आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !