तरुण शेतमजुराची आत्महत्या : पाचोरा तालुक्यातील या गावातील घटना


पाचोरा : तालुक्यातील खडकदेवळा येथील 30 वर्षीय शेतमजुराने शेतातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. भैय्या राघो मोरे (30) असे मयताचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
खडकदेवळा, ता.पाचोरा येथील भैय्या राघो मोरे (30) या शेतमजूर तरुणाने शिवारातील शेतातील झाडाला दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेबाबत पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मृतदेहाचे शवविच्छेदन पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित साळुंखे यांनी केले. मयत भैय्या राघो मोरे यांच्या पश्चात्य वृद्ध आई, वडील, पत्नी, दोन मुले व एक लहान भाऊ असा परीवार आहे. भैय्या मोरे यांनी आत्महत्या का केली ? याचे कारण समजू शकले नाही. अधिक तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विनोद शिंदे करीत आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !