रीक्षात चक्कर आल्यानंतर प्रवाशाचा ओढवला मृत्यू


जळगाव : शहरात सिंधी कॉलनी येथून रीक्षात प्रवासी म्हणून बसलेल्या प्रवाशाचा धावत्या रीक्षातच चक्कर येवून काही वेळातच मृत्यू झाला. ही घटना गुरुवार, 9 डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रसय्य रसुल (धावडा) असे मयताचे नाव आहे.

रीक्षात प्रवाशाचा मृत्यू
धावडा येथील सय्यद रसूल हे कामानिमित्ताने जळगावात आले होते. गुरुवारी ते सिंधी कॉलनी येथून रीक्षात बसले. प्रवासादरमयन अचानक सय्यद रसूल यांना चक्कर आले. रीक्षा चालक वासुदेव मुरलीधर पाटील यांनी त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले. रसूल यांच्याजवळ असलेल्या कागदपत्रांवरुन त्यांची ओळख पटली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस नाईक जयंत कुमावत करीत आहेत.






 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !