राष्ट्रीय पतपेढीचे कार्य कौतुकास्पद : आमदार डॉ.सुधीर तांबे

मयत चार शिक्षकांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांच्या विम्याची मदत


चाळीसगाव : शहरातील राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सेवकांची सहकारी पतसंस्थेमार्फत सभासदांच्या पाल्यांना वार्षिक पारीतोषिक वितरण तसेच मयत सभासदांच्या वारसांना धनादेश व उल्लेखनीय कार्य केलेल्या शिक्षक बांधवांचा सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक विभागाचे शिक्षक आमदार डॉ.सुधीर तांबे, शहर पोलिस निरीक्षक के.के.पाटील, राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे चिटणीस वृक्षमित्र अरुण निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पतपेढीचे मयत सभासद शिक्षक एस.ए.पाटील, राजेंद्र सुर्यवंशी, मगर, एस.के.पाटील यांच्या वारसांना पतसंस्थेच्या विमा योजनेतून प्रत्येकी पाच लाखांचा धनादेश वितरीत करण्यात आला. सभासदांच्या विविध शैक्षणिक क्षेत्रात प्रथम आलेल्या पाल्यांना रोख रक्कम देण्यात आली. सर्वात जास्त वर्गणी जमा असलेल्या शिक्षकांना एक हजार हजार धनादेशाद्वारे वितरीत करण्यात आले तसेच शालेय उपक्रमात व सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य करणार्‍या आदर्श शिक्षकांचा सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
यावेळी राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.संजय देशमुख, दुय्यम चिटणीस संजय पाटील, संचालक आनंदराव पाटील, सुरेश स्वार, एम.डी.सूर्यवंशी, धर्मा वाघ, अजय देशमुख, सी.सी.वाणी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी पतपेढीच्या विविध सेवाभावी उपक्रमांचे कौतुक केले. प्रास्ताविक पतपेढीचे अध्यक्ष भास्करराव बागल यांनी तर सूत्रसंचालन प्रा.तुषार चव्हाण यांनी केले. राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सेवकांच्या सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष बी.एम.बागल, सचिव आर.टी.मोरे, उपाध्यक्षा मंगला साळुंखे, सहसचिव प्रशांत देशमुख, कर्मचारी वृंद सुनील पाटील, आशिष पंडित, प्रकाश मंजाळ व सर्व संचालक मंडळाने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !