जळगावात घरफोडी : 17 हजारांचा मुद्देमाल लंपास
जळगाव : शहरातील गुजराल पेट्रोलपंप परीसरातील देवरात नगरात चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्याचे दागिनेसह रोकड मिळून 17 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली
वैशाली भिकन मराठे (52, रा.देवराम नगर, गुजराल पेट्रोल पंपा परीसर, जळगाव) या आपल्या कुटुंबीयासंह वास्तव्याला आहेत. शुक्रवार, 10 डिसेंबर रोजी रात्री त्या घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेरगावी गेल्या असता मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या मुख्य दरवाजाचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कापाटाचे लॉकर तोडून ठेवलेले सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण 17 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार शनिवार, 11 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता उघडकीला आला. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





