शिरसोली येथील जिन्यावरून पडल्याने एकाचा मृत्यू
जळगाव : तालुक्यातील शिरसोली येथे राहणार्या 52 वर्षीय व्यक्तीचा लोखंडी जिन्यावरून खाली पडल्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हिलाल रामदास डेंगळे (52, शिरसोली प्र.न.) असे मयताचे नाव आहे.
जीन्यावरून पास घसरल्याने मृत्यू
हिलाल रामदास डेंगळे (52, रा.शिरसोली प्र.न., ता.जि.जळगाव) हे शेतीतील मजुरीचे काम आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास होते. शनिवार, 12 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता जेवण करून ते गच्चीवर गेले. दरम्यान गच्चीवरून लोखंडी जिन्यातून खाली उतरत असताना त्यांचा पाय घसरला व ते खाली पडले. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, हिरकणबाई, मुलगा प्रवीण आणि दोन विवाहित मुली असा परीवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. सोमवारी 13 डिसेंबर रोजी सकाळी शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.


