बँकेने सील केलेले बंद घर फोडण्याचा प्रयत्न : जळगावातील घटना
जळगावात बँकेने सील केलेले बंद घर फोडण्याचा प्रयत्न
जळगाव : शहरातील शिवबा नगर परीसरात बँकेने सील केलेले घर अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीला आला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.





अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू
पवन वसंत सोनवणे (शिवबा नगर, जळगाव) यांचे जळगाव शहरातील तालुका पोलिस हद्दीत असलेले गट नंब 185 मध्ये प्लॉट नंबर 29 येथे घर आहे. सध्या हे घर आरसीएल बँक, मुंबई यांच्या ताब्यात आहे व घराच्या दरवाजाला कुलूपाला बँकेने सील लावले आहे. दरम्यान, 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 ते 12 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याच्या इराद्याने घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पवन सोनवणे यांनी बँकेला माहिती दिली. दरम्यान दीपक कृष्णाजी शिंदे (41, रा.सिंहस्थ नगर, नवीन सिडको, नाशिक1) यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलिस ठाण्यात सायंकाळी पाच वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार अनिल तायडे करीत आहे.
