अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या विवाहितेची आत्महत्या


धायरी : अवघ्या दोन महिन्यांपूर्वी विवाह केलेल्या रंगोली भास्कर वडावराव (32, धानोरी, पुणे) या महिलेने हॉटेलमध्ये आत्महत्या केली.गोर्‍हे बुद्रुक येथील एका हॉटेलमध्ये ही घटना शनिवारी उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंगोली वडावराव ही महिला दुपारी दोन वाजता सिंहगड रस्त्यावरील गोर्‍हे बुद्रुक येथील हॉटेलमध्ये एक दिवसाकरीता रहावयास आली होती. सायंकाळी वेटरने दरवाजा वाजवला असता आतून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने हॉटेल चालकाने पोलिसांनी कळवले. रात्री पोलीस आल्यानंतर दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता महिलेने ओढणीने गळफास घेतल्याचे दिसून आले. याबाबत हवेली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

दोन महिन्यापूर्वीच झाले होते लग्न
रंगोली वडावराव या पहिल्या पतीपासून विभक्त झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी दोन महिन्यांपूर्वीच दुसर्‍या व्यक्तीबरोबर लग्न केले होते. त्यांना पहिल्या पतीपासून सात वर्षांचा एक मुलगा आहे. कौटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.






 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !