भुसावळ लोहमार्गच्या 11 पोलिसांचा पोलिस महासंचालकांंनी केला गौरव
भुसावळ : भुसावळ लोहमार्ग विभागाच्या 11 पोलिस अधिकारी व कर्मचार्यांनी गेल्या काळात केलेल्या विशेष कामगिरीबद्दल त्यांना मुंबईत अपर पोलिस महासंचालक, पोलिस महासंचालक यांच्याहस्ते बक्षिसासह प्रशस्तीपत्र देवून कामगिरीचा गौरव करण्यात आला.
यांचा झाला सन्मान
भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजय घेरडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक भाऊसाहेब मगरे, पोलिस हवालदार जगदीश ठाकूर, हवालदार सागर खंडारे, दिवानसिंग राजपूत, अजित तडवी, सचिन दैवे, पोलिस उपनिरीक्षक संजय साळुके, रामकृष्ण खंडागळे, नरेंद्र लोढे, पोलिस नाईक ज्योती शाहू यांना विशेष कामगिरीसाठी मुंबईतील घाटकोपर येथे झालेल्या कार्यक्रमात पेालिस महासंचालक, अप्पर पोलिस महासंचालकांच्या हस्ते गौरविण्यात आले.


