बोदवड महाविद्यालयात गणित विभागातर्फे गणितीय सूत्र परीक्षा
बोदवड : बोदवड महाविद्यालयातील गणित विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी गणितीय सूत्र परीक्षेचे आयोजन नुकतेच करण्यात आले. विविध स्पर्धात्मक परीक्षेची पूर्वतयारी तसेच स्पर्धात्मक परीक्षेतील गणित विषयातील सूत्रांचे महत्त्व आणि त्यातील बारकावे लक्षात यावे, या हेतूने विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले. प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांच्या यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या परीक्षेत कोमल राणे या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक पटकावला तर गायत्री तळेले द्वितीय तसेच वैष्णवी माळी तृतीय आली. स्नेहल वंजारी या विद्यार्थीनीने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. परीक्षेत विद्यार्थीनींनी बाजी मारली. परीक्षा यशस्वीपणे राबविण्यासाठी उपप्राचार्य डॉ. व्ही.पी.चौधरी, डॉ.रूपेश मोरे, डॉ.चेतनकुमार शर्मा, प्रा.नरेंद्र जोशी, प्रा.गीता पाटील, समीर पाटील यांनी परीश्रम घेतले.


