रावेरातील डॉक्टरांची मानवता ः सैनिकांच्या कुटूंबियांवर मोफत उपचार
रावेर : शहरातील माऊली हॉस्पिटलचे संचालक प्रसिध्द स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. संदीप पाटील हे सैनिकांच्या पत्नीचे आरोग्य विषयक उपचाराचे मोफत निदान व प्रसुती करतात. तालुक्यात माऊली एकमेव रुग्णालय असेल जेथे सैनिकांच्या देशसेवेसाठी त्यांची सेवा करून देशसेवा करतात.न ुकतेच एका सैनिकाच्या पत्नीचे सीजर झाल्याने त्या सैनिकाने डॉक्टरांना आभारासाठी पत्र लिहून आभार मानले. वर्षभरात किमान शंभर रुग्णांवर उपचार केले जातात. यात काही सैनिकांच्या पत्नीची नॉर्मल प्रसुती, सीजर, काहींची नियमीत तपासणी, काहींना आरोग्य विषयक तक्रारी असल्यास त्याची तपासणी ही मोफत केली जाते.
सैनिकाच्या कुटुंबियांवर मोफत उपचार
निरूळ येथील रहिवासी विजय मधुकर शिंदे (सीटी-जीडी, सीआरपीएफ, 66, बटालियन, केवाकोल, जिल्हा मेदनीपूर, वेस्ट बंगाल) हे केंद्रीय राखीव दलात देशसेवेत कार्यरत आहे. त्यांची पत्नी राणी विजय शिंदे या गरोदर असल्याने प्रसुतीसाठी माऊली हॉस्पीटलमध्ये 30 एप्रिल 2022 रोजी सकाळी दाखल झाल्या. रुग्णालयात राणी शिंदे यांचे सीझरद्वारे प्रसुती झाली तसेच बाळासह आईची प्रकृती उत्तम असल्याने हॉस्पीटलकडून मिळालेले सहकार्य अनमोल असल्याचे शिंदे म्हणाले. सुटी करण्यासाठी त्यांनी बिलाची विचारणा केली असता रुग्णालयातून सैनिकांच्या परीवाराचे बिल घेत नसल्याची माहिती मिळताच त्यांना सुखद धक्का बसला. सैनिकांच्या कुटूंबींयावर मोफत उपचार करून देशसेवा करत असल्याचा आनंद शिंदे यांना झाला. सैन्यदलातर्फे त्यांनी डॉक्टरांचे आभार मानले व डॉक्टरांची सेवा ही खरोखर देशसेवे सारखीच असून वाखाणण्याजोगे असल्याचे ही ते म्हणाले. रुग्णाला भरती करतांना आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती न होती व आम्ही पैशांची तजवीज करून ठेवली होती मात्र सुटी करण्यासाठी बिलाची विचारणा केल्यावर सर्व प्रकार माहित झाल्याचे ही शिंदे म्हणाले.


