यावल पोलिस ठाण्यात आयपीएस अधिकारी आशीत कांबळे रूजू


यावल : यावल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांची विनंतीवरून नाशिक ग्रामीणमध्ये बदली झाल्याने त्यांच्या रीक्त जागेवर परीविक्षाधीन आयपीएस अधिकारी आशित कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी नुकतीच सूत्रे स्वीकारली आहेत. पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी शहरात सहाय्यक पोलिस निरीक्षक अजमलखान पठाण, पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, सहाय्यक फौजदार असलम खानसह पथकाला घेवुन शहरात विविध ठिकाणी फेरफटका मारत शहरातील संवेदनशील व वर्दळीचे ठिकाण जाणून घेतले. परीविक्षाधीन आयपीएस अधिकारी म्हणून निवड झालेले आशित कांबळे हे उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील आहेत. पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी शहर व तालुक्यातील रहदारीच्या रस्त्यावरील बेशिस्तपणा, गुन्हेगारी, शेतकर्‍यांच्या पीक नासाडीचा प्रश्न, अवैध धंदे सह कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करू, असे प्रसंगी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !