भुसावळातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले
भुसावळ : भुसावळ शहरातील एका भागातील अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञाताविरोधात गुन्हा
भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ परीसरातील एका भागात राहणार्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. मंगळवार, 5 एप्रिल रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीला आला. मुलीच्या नातेवाईकांनी परीसरात शोध घेतला असता ती कुठेही आढळून न आल्याने त्यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन वाघमारे करीत आहे.


