ज्येष्ठ नागरीकांची उतारवयात मुलगा, सून काळजी घेत नसल्यास कायद्याने मिळेल ‘न्याय’

भुसावळ पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे ः भुसावळात ज्येष्ठांना मार्गदर्शन


भुसावळ : कुठलीही बँक कधीही ग्राहकाला ओटीपी वा एटीएम पीन क्रमांक विचारत नाही त्यामुळे कुठलाही कॉल आल्यानंतर बँक डिटेल देताना सतर्कता बाळगावी शिवाय ऑनलाईन व्यवहार करतानाही ज्येष्ठांनी सजग रहावे, असे आवाहन भुसावळचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी येथे केले. गुरुवारी ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान संचलित, वासुदेव ज्येष्ठ नागरीक संघाच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ज्येष्ठ नागरीक-ऑनलाईन व्यवहार-फसवणूक या विषयावर ते बोलत होते.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर सहा.पोलिस अधीक्षक आतीश कांबळे, अध्यक्ष धनराज पाटील, उपाध्यक्ष प्रभाकर झांबरे आदी उपस्थित होते. सहा.अधीक्षक आतीश कांबळे म्हणाले की, बँकेत जातांना नेहमीचा रीक्षा चालक सोबत असावा, घरातील एखादा व्यक्ती सोबत असल्यास गैरसोय होणार नाही शिवाय बँक कधीही आपला ओटीपी, पीनबद्दल विचारणा करत नाही. अनोळखी क्रमांकावर आलेल्या कॉलवर बोलणे टाळावे, ऑन लाइन पारितोषिक, रोख अश्या विविध स्क्रीमच्या अमिषाला बळी पडू नका, फसवणूक होत आहे अस वाटल्यास लगेच संबंधित बँक, पोलीस प्रसासनाकडे संपर्क करावा, असे आवाहन त्यांनी केले. सोनू भिरूड, अजराम चौधरी, यशवंत वारके, प्रकाश पाटील, प्रमोद बोरोले, रमण भोगे, पुंजो भारंबे, लोटू फिरके, भानुदास पाटील, मधुकर पाटील, प्रभाकर शिंपी, मधुकर दौलत पाटील, आबा मालवीया आदी जेष्ठ नागरिक यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकाश पाटील यांनी केले तर आभार प्रभाकर झांबरे यांनी मानले.

मुले काळजी घेत नसल्यास कायद्यात तरतूद
पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे म्हणाले की, फसव्या फोन कॉलपासून सावध रहावे तसेच मोबाईलवर आलेला ओटीपी वा एटीएम पीन कुणालाही सांगू नये तसेच ज्येष्ठांना मुलगा, मुलगी, सून आणि जावई उतारवयात योग्य काळजी घेत नसल्यास त्याबद्दल कायद्यात तरतूद आहे. त्याच्या आधारे आपण त्यांना कायद्याचा हिसका दाखवू शकतो, या कायद्याच्या तरतूदीनुसार आपण त्यांना योग्य पध्दतीने वागविण्यास भाग पाडू शकतो, अशी कायदेशीर तरतूद विविध उदाहरणे देत त्यांनी उपस्थित ज्येष्ठांना मार्गदर्शन केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !