भुसावळातील 40 वर्षीय इसमाची गळफास घेत आत्महत्या


भुसावळ : शहरातील गौतम नगरातील रहिवासी उमेश रमेश तायडे (40) यांनी शनिवारी सकाळच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
गौतम नगरातील रहिवासी उमेश तायडे यांनी शनिवारी सकाळी त्यांच्या राहत्या घरात 6 ते 6.30 वाजेच्या सुमारास गळफास घेतला. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मोठा आक्रोश केला. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचमाना केला. आनंदा अरुण तायडे यांनी दिलेल्या खबरीनुसार बाजारपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हवालदार अन्वर शेख करीत आहेत.

सुनेच्या मारहाणीत जखमी सासर्‍याचा अखेर मृत्यू : पाचोरा शहरात खळबळ 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !