शेअर बाजाराच्या आमिषाने घातला चार कोटी रुपयांचा गंडा


पुणे : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास चांगल्या प्रकारे परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एका व्यावसायिकासह त्यांच्या 15 ते 20 मित्रांची 4 कोटी 28 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी ऋषीकेशअप्पा भोसले (रा.वनगळ, जि. सातारा) याच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळात तरुणावर वाढदिवशीच क्रुर काळाने घातली झडप

विश्वास संपादन करीत लुबाडली रक्कम
याबाबत विनायक पांडुरंग बगाडे (50, रा.सांगवी, पुणे) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. ऋषीकेश भोसले याची हडपसर परिसरात वैभव थिएटर जवळ शेअर ट्रेडिंगचे कार्यालय आहे. त्याठिकाणी विनायक बगाडे यांची भेट झाल्यानंतर त्याने स्वत:चा आर्थिक फायदा करण्यासाठी बगाडे यांचा विश्वास संपादन केला. चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून त्याने तक्रारदार व त्यांच्या 15 ते 20 मित्रांकडून एकूण 4 कोटी 28 लाख रुपयांची रक्कम गुंतवणूक करण्यास भाग पाडून नाम मात्र परतावा दिला, गुंतवणूक केलेले पैसे परत न करता तक्रारदार व त्यांच्या मित्रांची फसवणूक केली.

एस.टी.कर्मचार्‍यांचे वकील गुणवंत सदावर्ते पोलिस कोठडीत




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !