गावठी कट्टा व तीन जिवंत काडतूसांसह आरोपी धुळे एलसीबीच्या जाळ्यात


धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने गावठी कट्टा व तीन जिवंत काडतूस बाळगणार्‍या आरोपीला अटक केली आहे. अत्तरसिंग गुजा पावरा (रा.गोरक्षनाथ पाडा, हिसाळे, शिरपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. शिरपूर तालुक्यातील हिसाळे येथे बुधवारी ही कारवाई करण्यात आली.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले : या विभागातील 10 हजार 127 पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया

गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना संशयीत अत्तरसिंग पावराबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला आदेश दिले होते. बुधवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास संशयीत आल्याची माहिती मिळाल्यानंतर
पथकाने घरावर छापा टाकला मात्र पोलिसांची चाहुल लागताच अत्तरसिंग पावरा हा घराच्या पाठीमागील दरवाजातून अंधाराचा फायदा घेवुन पळून गेला. घर झडतीत 25 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा व तीन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. या प्रकरणी एलसीबीचे महेंद्र सपकाळ यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात थाळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कामगिरी धुळे पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक निरीक्षक प्रकाश पाटील, उपनिरीक्षक योगेश राऊत, हवालदार श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, संजय पाटील, मयुर पाटील, तुषार पारधी, महेंद्र सपकाळ, कैलास महाजन आदींच्या पथकाने केली.

राज्यसभेच्या रीक्त सहा जागांसाठी 10 जूनला निवडणूक


कॉपी करू नका.