भुसावळात नाकाबंदीत वॉरंटवरील संशयीतासह मारहाणीतील आरोपी जाळ्यात


37 वाहनांवर कारवाई : अपर पोलिस अधीक्षकांची भेट

भुसावळ- पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या आदेशाने शहर व विभागात पोलिसांनी शनिवारी रात्री 11 ते पहाटे चारपर्यंत ऑल आऊट मोहीम राबवली. या मोहिमेत बाजारपेठ पोलिसांनी अटक वॉरंटमधील एका संशयिताला तर तालुका पोलिसांनी गुन्ह्यातील दुसर्‍या संशयिताला अटक केली शिवाय शहरासह महामार्गावर नाकाबंदी करून 37 वाहन धारकांवर कारवाई करण्यात आली. अटक वॉरंटमधील संशयित राहुल देवीदास चौधरी याला पोलिसांनी अटक केली तर किन्ही येथील हेमंत चौधरी यांच्यावर शुक्रवारी रात्री झालेल्या हल्ल्याप्रकरणी संशयीत शब्बीर गवळी याला शिवपूर कन्हाळा येथून तालुका पोलिसांनी अटक केली. दरम्यान, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी शनिवारी रात्री भुसावळ येथे भेट देऊन नाकाबंदीचा आढावा घेतला.


कॉपी करू नका.