82 वर्षीय वयोवृद्धाचा साकेगावात मृतदेह आढळला
भुसावळ : 82 वर्षीय अनोळखी वृद्धाचा भुसावळ तालुक्यातील साकेगाव शिवारातील अप रेल्वे लाईनीच्या बाजूला मृतदेह आढळला आहे. अनोळखीची ओळख पटलेली नसल्याने लोहमार्ग पोलिसांनी ओळख पटवण्याचे आवाहन केले आहे.

मयत भिकारी असल्याचा संशय
रविवारी साकेगाव येथील नेहल राजेंद्र पाटील यांच्या शेतात 80 ते 82 वर्षाचा मयत व्यक्ती शेतात बांधाजवळ पडून असल्याची माहिती पाटील यांनी तालुका पोलिस ठाण्यात दिल्यावरून सहायक पोलिस निरीक्षक अमोल पवार, हवालदार वाल्मीक सोनवणे यांनी घटनास्थळ गाठले. यावेळी मृत व्यक्ती हा भिकारी असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. त्याच्याजवळ मोठ्या प्रमाणावर चिल्लर मिळाली असून मयत साकेगाव येथे भीक मागून उदरनिर्वाह करीत असल्याचे स्पष्ट झाले. ट्रामा केअर सेंटरमध्ये अनोळखीस हलवल्यानंतर त्यास मृत घोषीत केले. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हवालदार वाल्मीक सोनवणे पुढील तपास करीत आहे.
