लालमाती येथील अल्पवयीन मुलीस पळवले : एकाविरोधात गुन्हा
Kidnapping A Minor girl From Lalmati : Crime Against One रावेर : पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवुन नेल्याप्रकरणी एकाविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. रविवार, 26 जुन रोजी लालमाती येथील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही घरात एकटी असल्याची संधी साधुन कुर्बान मुबारक तडवी याने तिला फुस लावुन पळवून नेले.
संशयीताविरोधात गुन्हा
रावेर पोलिस स्थानकात आरोपी कुर्बान तडवी याच्याविरुध्द मुलीच्या पित्याने दिलेल्या फिर्यादीनुसार भादंवि 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीपाली पाटील करीत आहे.


