महिलेचा विनयभंग करीत कुटुंबाला धमकावले : जळगावातील पूजार्‍यासह सहा जणांविरोधात गुन्हा


Threatening family by molesting woman: Crime against six people including priest in Jalgaon जळगाव : जळगावातील महिलेचा विनयभंग करून तिच्या कुटुंबियांना धमकावल्या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर जळगावातील सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मंदिरात गेल्यानंतर केला विनयभंग
शहरातील एका भागातील महिला ही 2 मे 2022 रोजी मंदिरात गेली असता येथे राम बालकदास यांनी लज्जास्पद वाटेल, असे कृत्य करून विनयभंग केला. या प्रकरणात महाराजविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा शहर पोलिसांनी नोंदवून घेतला असला तरी पोलिसांनी त्याला नंतर सोडून दिले. यानंतर त्या महिलेने तक्रार मागे घ्यावी म्हणून महाराजसह सहा जणांनी घरावर हल्ला केला होता मात्र पोलिसांनी याची तक्रार नोंदवून घेतली नाही. यामुळे त्या महिलेने न्यायालयात धाव घेतली.

न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा
न्यायालयाने बुधवारी निकाल देतांना या प्रकरणी तातडीने गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिलेत. यानुसार राम बालकदास, सागर संजय पोळ, गोलू तुकाराम रणसिंघे, गौरव युवराज डांबे, प्रवीण पांडुरंग निंबाळकर (रा.शाहूनगर) या सहा जणांविरुद्ध विनयभंग, चोरी, कुटुंबीयांना मारहाण केल्याप्रकरणी बुधवारी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. यातील राम आरोपी बालकदास हा पूजारी आहे.

झेलम एक्सप्रेसमध्ये अल्पवयीन मुलीवर पॅन्ट्रीकारमध्ये बलात्कार : आरोपीला पुण्यातून अटक


कॉपी करू नका.