Bus collides With Two-Wheeler: Gang Youth Killed On The Spot बसची दुचाकीला धडक : टोळीतील युवक जागीच ठार
Bus collides with two-wheeler: Gang youth killed on the spot अमळनेर : भरधाव बसची दुचाकीला धडक बसल्याने पारोळा तालुक्यातील टोळी येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सावखेडा चौफुलीजवळ पातोंडा फाट्याजवळ सोमवार, 15 रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडला. मनोज युवराज पाटील (टोळी, ता.पारोळा) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
दुचाकीचा झाला चेंदामेंदा
इगतपुरी आगाराची चोपडा-नाशिक बस (एम.एच.40 वाय.5977) ही चोपड्याकडून नाशिकच्या दिशेने जात असताना सावखेडा चौफुलीपासून काही अंतरावर मनोज पाटील हा युवक चोपडा शहराकडे येत असताना त्याच्या दुचाकीला बसची जबर धडक बसली. सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातामुळे दुचाकी शंभर मीटरपर्यंत फरफटत जाऊन तिचे भाग वेगवेगवे झाले व ती जळून खाक झाली. बसमधील काही प्रवाशांच्या माहितीनुसार समोरून जलदगतीने येणार्या मोटारसायकलस्वाराला वाहकाने आरडाओरडा करून वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही मोटारसायकल बसवर आदळली.

अपघातानंतर ग्रामस्थांची धाव
अपघाताची माहिती कळताच पातोंडा येथील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी मयताच्या छातीवर असलेलं नाना नाव व मोबाईल क्रमांक व मोटारसायकल क्रमांकावरून मयताची ओळख पटवली. धरणगाव पोलीस कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले. तासाभरात अमळनेर पोलीस दाखल होऊन घटनास्थळीचा पंचनामा करून शव विच्छेदनासाठी नेण्यात आले. तसेच अमळनेर आगारातील अधिकार्यांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
