A bus driver was beaten up by two people near Jalgaon SP office जळगाव एस.पी.कार्यालयाजवळच बस चालकाला दोघांकडून मरहाण
A bus driver was beaten up by two people near Jalgaon SP office जळगाव : जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या राम मंदिरासमोरून बस घेऊन जात असलेल्या बस चालकाला दोन जणांनी मारहाण केली. या प्रकरणी रविवार, 14 ऑगस्ट रोजी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बस चालकाला मारहाण
नरेंद्र दिनकर पाटील (35, रा.निवृत्तीनगर) हे त्यांच्या ताब्यातील बस (एम.एच.20 डी.एल.4095) ही बस ठाणे येथून जळगावकडे घेऊन येत असताना स्वातंत्र्य अमृत महोत्सवाच्या झाल्यामुळे पोलीस अधीक्षक कार्यालय ते स्वातंत्र्य चौक परिसरातील रस्ता वनवे करण्यात आला. त्यातच नरेंद्र पाटील हे गर्दीतून बस हळूहळू चालवत असताना पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या शेजारी असलेल्या राम मंदिराजवळ दुचाकीवरील कुणाल महेश कोळंबे (रा. केमिस्ट भवनसमोर जळगाव) व मोहित रमेशलाल काटपाल (रा. नेत्र ज्योती हॉस्पिटल समोर, जळगाव) यांच्यासह दोन जणांनी बस अंगावर आणतो का असे म्हणत बस चालक नरेंद्र पाटील यांना शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.

चौघांविरोधात गुन्हा दाखल
याप्रकरणी बस चालक नरेंद्र दिनकर पाटील यांच्या तक्रारीनुसार कुणाल कोळंबे, महेश काटपाल या दोघांसह आणखी दोन जणांविरोधात जिल्हा पेठ पोलिसात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार करीत आहेत.
