सहा गावठी कट्यासह चार आरोपी चोपडा शहर पोलिसांच्या जाळ्यात


चोपडा : शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे बुधवार, १७ रोजी रात्री चोपडा – शिरपूर रस्त्यावरील एस्सार कंपनीच्या पेट्रोल पंपाजवळ अवैद्य शस्त्र खरेदी विक्री करतांना तब्बल चार आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून ६ गावठी बनावटीचे कट्टे, ३० जिवंत काडतूस, ४ मोबाईल फोन व फोर्ड एंडेवेअर कंपनीचे चार चाकी वाहन असा एकूण रु. ३७ लाख ३७ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
17 रोजी रात्री ९.३० वाजता सुमारास चोपडा ते शिरपुर रोडवर एस्सार पेट्रोलपंपाजवळ आरोपी गणेश उर्फ सनी सुनील शिंदे ( 25, रा.ओगलेवाडी, ता. कराड, जि.सातारा, मोहसीन हनिफ मुजावर (30, रा.युवराज पाटील चौक, मसुर ता.कराड जि. सातारा), रीजवान रज्जाक नदाफ (23 रा. शिवाजी चौक, मलकापूर, ता.कराड. जि. सातारा), अक्षय दिलीप पाटील (28, रा.45, रविवार पेठ, कराड जि.सातारा) अशांनी अवैद्य शस्त्र खरेदी विक्री करणारा आरोपी नामे सुरज विष्णु सांळुखे (रा.कराड जि.सातारा) याचे सांगण्यावरुन आरोपी नामे सागर सरदार पुर्ण नांव माहिती नाही (शिखलकर) (रा.पारउमर्टी ता.वरला, जि.बडवानी) याच्या जवळून 6 गावठी बनावटीचे पिस्टल (कट्टा) मॅग्झीनसह तसेच 30 पिवळया धातुचे जिवंत काडतुस हे विनापरवाना व बेकायदेशीररित्या स्वताच्या कब्ज्यात बाळगून कोणास तरी विक्री करण्याच्या उद्देशाने आढळून आल्याने चारही जणांना ताब्यात घेण्यात आले. त्याचे ताब्यातील 1,20,000 रुपये किंमतीचे 6 गावठी कट्टे, 30,000 रुपये किंमतीचे 30 जिंवत काडतूस, 87000/- रुपये किमंतीचे 4 मोबाईल फोन व 35,00,000/- रुपये किमंतीची फोर्ड एन्डेव्हर कपंनीचे वाहन क्रंमाक MH 50 L 8181 या चार चाकी वाहनासह 37,37000/- किमंतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी हे संगनमताने गुन्हा करतांना मिळुन आल्याने चोपडा शहर पोस्टे. भाग 5 गुरनं. 336/2022 भादंवि कलम 34 प्रमाणे आर्म अॕक्ट 3/25, 7/25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहा.पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दीपक विसावे, संतोष पारधी, संदीप भोई, शुभम पाटील, प्रमोद पवार व प्रकाश मथूरे आदिंच्या पथकाने केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सावळे हे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !