धक्कादायक ! : 60 मुलींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ केला व्हायरला : आठ विद्यार्थिनींचा आत्महत्येचा प्रयत्न


Shocking! : Video of 60 girls taking bath goes viral : Eight students attempt suicide नवी दिल्ली : पंजाबच्या चंदीगड विद्यापीठात एकीने अंघोळ करताना इतर विद्यार्थिनींचा व्हिडिओ बनवत व्हायरल केला व हा प्रकार समोर येताच वसतिगृहातील आठ विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. पंजाबच्या मोहालीतील एका विद्यापीठात रात्री उशिरा परिस्थिती अनियंत्रित झाली.

बर्‍याच काळापासून बनवला जात होता व्हिडिओ
चंदीगडच्या एका खासगी विद्यापीठात शनिवारी दुपारी अडीच वाजता मोठा गोंधळ झाला. गर्ल्स वसतिगृहातील एका मुलीने आंघोळ करताना इतर 60 मुलींचा व्हिडिओ बनवून तरुणांना पाठवल्याचा आरोप आहे. मुलांनी तो व्हिडिओ इंटरनेट मीडियावर व्हायरल केला. रिपोर्ट्सनुसार, गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहणार्‍या मुलींचा बराच वेळ अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला जात होता. हे प्रकरण दडपण्यासाठी व्यवस्थापन त्यांच्यावर दबाव आणत असल्याचे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी रात्री उशिरा विद्यापीठ परीसरात ठिय्या आंदोलन केले.

8 विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला
आंघोळ करताना विद्यार्थ्याने 60 मुलींचा व्हिडिओ (तळवशे) बनवला आणि हा व्हिडिओ एका तरुणाला पाठवला. तरुणाने विद्यार्थिनींना अंघोळ करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल र्(ींळवशे र्ींळीरश्र) केला. त्यानंतर 8 विद्यार्थिनींना मोठा धक्का बसला आणि त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. मुलींच्या वसतिगृहात राहणार्‍या एका विद्यार्थिनीनं अंघोळ करताना 60 विद्यार्थिनींचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केलाय. ही विद्यार्थिनी हे व्हिडिओ एका मुलाला पाठवत होती आणि तो मुलगा ते व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करायचा. या प्रकरणात अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. याबाबत पोलिसांनाही माहिती देण्यात आली.

 


कॉपी करू नका.