पाडळसे शिवारातून वीज कंपनीचे 15 हजारांचे विद्युत तार चोरीला


15,000 electrical wires of the electricity company were stolen from Padalse Shiwar यावल : तालुक्यातील पाडळसे येथील शेत शिवारातून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे विद्युत तार अज्ञात भामट्यांनी लांबवले. सुमारे 40 किलो वजनाचे 15 हजार रुपये किमतीचे तार खांबावरून काढून लांबवण्यात आले. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू
पाडळसे, ता.यावल या गावाजवळ लागूनच दिलीप निवृत्ती पाटील व रामचंद्र तापीराम पाटील यांच्या शेत बांधावर विद्युत वितरण कंपनीचे खांब आहेत. या खांबावरील अ‍ॅल्युमिनियमचे व सुमारे 15 हजार रुपये किंमतीचे विद्युत तर अज्ञात भामट्याने लांबवले. हा प्रकार निदर्शनास येतात विद्युत वितरण कंपनीचे अभियंता सुभाष प्रल्हाद कोळी यांनी फैजपूर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिल्यानंतर फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध विद्युत तार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास फैजपूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक उमेश सानप करीत आहेत.


कॉपी करू नका.