चार हजारांची लाच भोवली : पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्याचा लाचखोर हवालदार जळगाव एसीबीच्या जाळ्यात


Bribe of 4000: Bribery Constable of Pimpalgawar Hareshwar Police Station in Jalgaon ACB’s net जळगाव : तक्रारदार शेतकर्‍याची बैलगाडी व भाडे परत मिळवून देण्यासाठी तडजोडीअंती चार हजारांची लाच स्वीकारणार्‍या पिंपळगाव हरेश्‍वर, ता.पाचोरा पोलिस ठाण्यातील हवालदारासह खाजगी पंटरासह जळगाव एसीबीने लाच स्वीकारताच अटक केल्याने पोलिस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. राकेश दत्तात्रय खोंडे (43, रा.पुनगाव रोड, पाचोरा) व खाजगी पंटर सुकलाल शांताराम पाटील (46, रा.दत्त कॉलनी, नवीन कॉलेजमागे, पाचोरा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. मंगळवार, 4 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता पाचोरा शहरातील महाराणा प्रताप चौकात जळगाव एसीबीने हा सापळा यशस्वी केला.

चार हजारांची लाच भोवली
पिंपळगाव हरेश्‍वर पोलिस ठाणे हद्दीतील 30 वर्षीय तक्रादार शेतकर्‍याने वर्षभरापूर्वी बैलगाडी भाड्याने दिल्यानंतर संबंधिताने ती परत दिली नाही तसेच भाडेदेखील दिले नाही त्यामुळे बैलगाडी व भाडे परत मिळवून देण्यासाठी पिंपळगाव हरेश्‍वर पोलिस ठाण्याचे हवालदार राकेश खोंडे यांनी मंगळवारी पाच हजारांची लाच मागितली मात्र तक्रारदाराकडे चार हजार असल्याने त्यावर तडजोड झाली. तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर लाचेची मंगळवारी पडताळणी झाल्यानंतर पाचोरा शहरातील महाराणा प्रताप चौकात तक्रारदाराला बोलावण्यात आल्यानंतर सापळा रचण्यात आला. खाजगी पंटर तथा चहा टपरी व्यावसायीक सुकलाल शांताराम पाटील (46, रा.दत्त कॉलनी, नवीन कॉलेजमागे, पाचोरा) यांच्याकडे लाचेची रक्कम देण्याचे सांगितल्यानंतर पथकाने आधी सुकलाल पाटील यास व नंतर आरोपी हवालदार राकेश खोंडे यास अटक करण्यात आली.

यांच्या पथकाने केला सापळा यशस्वी
पोलिस उपअधीक्षक शशीकांत एस.पाटील, निरीक्षक संजोग बच्छाव, निरीक्षक एन.एन.जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, नाईक जनार्धन चौधरी, नाईक किशोर महाजन, पोलिस नाईक बाळु मराठे, नाईक सुनील वानखेडे, नाईक ईश्वर धनगर, पोलिस कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, कॉन्स्टेबल राकेश दुसाने, कॉन्स्टेबल सचिन चाटे, कॉन्स्टेबल प्रणेश ठाकुर, कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी यांनी हा सापळा यशस्वी केला.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !