गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह जळगावातील संशयीत जाळ्यात
Gavathi Katta And live Cartridge in a Auspicious Net In Jalgaon जळगाव : शहरातील खोटे नगरातील तरुणाला गावठी कट्टा व जिवंत काडतूस व कुकरी बाळगताना जळगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. संशयीताविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. निखील सुरेश पाटील (35, खोटे नगर, सुरक्षानगर, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव शहरचे पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांना संशयीताबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले होते.
उपनिरीक्षक् दत्तात्रय ज्ञानदेव पोटे, हवालदार भास्कर यशवंत ठाकरे, पोलिस नाईक प्रफुल्ल दीपक धांडे, अमोल ठाकुर, रतन हरी गिते, ज्ञानेश्वर उन्हाळे यांना नवीपेठ भागातील बँक स्ट्रीट परीरसरातील सेंट्रल बँक ऑफ इंडीयासमोरून संशयीत निखील सुरेश पाटील यास ताब्यात घेतले. संशयीताच्या अंगझडती गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस तसेच कुकुरी आढळल्याने ती जप्त करण्यात आली. जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार भास्कर यशवंत ठाकरे करीत आहेत.

