महागडे गिप्ट देण्याच्या नावाखाली यावल तालुक्यातील तरुणीला साडेसहा लाखांचा गंडा


In the name of giving an expensive gift, a girl from Yaval taluka was extorted six and a half lakhs जळगाव :  इन्स्टाग्रामच्या माध्यमातून यावल तालुक्यातील एका गावातील 27 वर्षीय तरुणीला डॉ.मार्क नामक भामट्याने मैत्रीतील विश्वासानंतर महागडे गिप्ट पाठवण्याच्या नावाखाली साडेसहा लाखांचा गंडा घातला. फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्याने तरुणीने जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल केला.

गिप्ट देण्याच्या नावाखाली स्वीकारली रक्कम
यावल तालुक्यातील एका गावातील 27 वर्षीय तरुणीची ऑगस्ट महिन्यात इन्स्टाग्रामवर डॉ.मार्क नामक व्यक्तीशी मैत्री झाली. संशयीताने तरुणीच्या व्हॉट्सअ‍ॅपवर संपर्क केला. तरुणीशी बोलताना या व्यक्तीने बोलत विश्वास संपादन केला. यानंतर तरुणीला महागडे गिफ्ट पाठवीत असल्याचे सांगितले. गिफ्ट स्वीकारण्यासाठी पैसे भरावे लागणार असल्याचे सांगून वेळोवेळी तिच्याकडून तब्बल सहा लाख 49 हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवर मागवले.

अखेर गुन्हा दाखल
पैसे ऑनलाईन स्विकारून कोणतेही गिफ्ट न पाठवता आपली फसवणूक होत असल्याचे तरुणीच्या लक्षात आले. इंस्टाग्रामवर मैत्री करून तब्बल सहा6 लाख 49 हजारांचा चुना लावल्याप्रकरणी डॉ.मार्क नामक व्यक्ती विरोधात जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे हे करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !