24 तासात धान्य वाटप न झाल्यास तीव्र आंदोलन : मुक्ताईनगरात शिवसेना आक्रमक
मुक्ताईनगरात शिवसेना आक्रमक : तहसीलदारांना निवेदन
मुक्ताईनगर : शहरातील पुरवठा विभागाच्या भोंगळ कारभाराने दसरा व दिवाळी सणाच्या काळात गोरगरीब रेशन धान्यापासून वंचित राहत असल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार यांना शिवसेनेतर्फे निवेदन देण्यात आले. 24 तासात धान्य वाटप न झाल्यास तहसीलदार यांच्या दालनासमोर उग्र स्वरूपाचे आंदोलन शिवसेना स्टाईलने करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
भोंगळ कारभाराबद्दल संताप
मुक्ताईनगर तालुका पुरवठा विभागाचा अतिशय भोंगळ कारभार सुरू असून शहरातील सहा स्वस्त धान्य दुकानांवर पुरवठा वाहतूक कंत्राटदार व पुरवठा अधिकारी तसेच कर्मचारी यांचे अर्थपूर्ण संबंध असल्याने सुमारे तीन महिन्यांपासून धान्य पोहोचले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही दिवसांनी दिवाळी सण असून महत्त्वाचे सण असताना देखील अद्याप पर्यंत धान्य दुकानांवर धान्य पुरवठा न झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भाई, उपतालुकाप्रमुख प्रफुल पाटील, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अफसर खान, शहरप्रमुख गणेश टोंगे, राजेंद्र हिवराडे, गोपाळ सोनवणे, संतोष मराठे, संतोष माळी, शकुर जमादार, मुशीर मणियार, शकील मेंबर, साजीद खान, अनिकेत भोई, पिंटू पाटील, अवी अडकमोल सह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. दरम्यान, आमदार चंद्रकांत पाटील ेयांनी जिल्हाधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केल्यानंतर शहरातील सहा धान्य दुकानांमध्ये पोहोच झाले असल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, शहरप्रमुख राजेंद्र हिवराळे व गणेश टोंगे यांनी दिली.
