दिवाळीत सर्व रेशन कार्ड धारकांना शंभर रुपयांचे मिळावे कीट
शिवसेना पदाधिकार्यांची भुसावळ प्रांताधिकारी प्रशासनाला मागणी
भुसावळ : आगामी दिवाळी सणात शिंदे-फडणवीस सरकारने शंभर रुपयांमध्ये जाहीर केलेले कीट सर्वच कार्ड धारकांना द्यावे, अशी मागणी भुसावळातील शिवसेना पदाधिकार्यांनी प्रांताधिकारी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली.
हा तर अन्य कार्ड धारकांवर अन्याय
पिवळ्या रेशन कार्ड धारकांना म्हणजेच अंत्योदय योजनेतील रेशन कार्ड धारकांना एक किलो तेल, एक किलो रवा, एक किलो चना दाळ, एक किलो साखर असलेले किट 100 रुपयात सरकार देणार आहे. याचा लाभ फक्त पिवळ्या रेशन कार्ड धारकांना होणार आहे त्यामुळे केशरी कार्ड धारकांवर शिंदे व फडणवीस सरकार अन्याय करत असल्याचा जनमानसात रोष आहे. आज रोजी महागाई गगनाला भिडली असताना सर्वच सर्वसामान्य जनतेला रेशन किटची आवशक्यता असताना त्यांना दिवाळीचे किट का नाही? केशरी कार्ड धारक भारतात राहत नाही का? त्यांना मतदानाचा अधिकार नाही आहे का! शिंदे सरकार केशरी कार्ड धरकांवर अन्याय करीत असल्याची भावना शिवसैनिकांनी निवेदन देताना व्यक्त केली.

यांची होती उपस्थिती
निवेदन देताना शिवसेना शहरप्रमुख दीपक धांडे, हेमंत खंबाईत, अॅड कैलास लोखंडे, योगेश बागुल, राकेश खरारे, स्वप्नील सावळे, पिंटू भोई, अरुण साळुंके, संदीप पाटील, सोनी ठाकूर उपस्थित होते.
