सप्तश्रृंगी गडावर जाणार्‍या बसला आग : सुदैवाने टळली जिवीतहानी


Bus going to Saptashringi Fort caught fire: Fortunately, No loss of life was Avoided नाशिक : नाशिकमध्ये खाजगी बस अपघातानंतर पेटल्याने 12 प्रवाशांचा मृत्यू ओढवला तर मनमाड-मालेगाव महामार्गावर हायड्रोजन सिलिंडर नेणार्‍या वाहन उलटल्यानंतर सिलिंडर पेटल्याची दुर्घटना घडली असतानाच नाशिकच्या वणी गडावर भाविकांना घेवून जाणार्‍या बसला शॉर्ट सर्किटने आग लागल्याची घटना शनिवारी समोर आल्यानंतर खळबळ उडाली. सुदैवाने जिवीतहानी टळली आहे.

चालकाचे प्रसंगावधान
शनिवारी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान श्री सप्तशृंगी गड येथे ग्रामपंचायतीच्या टोलनाक्याच्या जवळ एस.टी.बस (क्रमांक एम.एच.14 बी.टी.3752)ला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. प्रसंगावधान राखून चालक आणि वाहक यांनी सर्व 33 प्रवाशांना खाली उतरवल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेमध्ये कुठल्याही भाविकाला अथवा कर्मचार्‍याला कोणत्याही प्रकारे इजा झालेली नसून सर्व सुरक्षित आहेत. दरम्यान, ही बस पिंपळगाव बसवंत आगाराची असल्याची माहिती आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !