श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात ‘साडी डे’ : पारंपरीक वेशभूषांनी वेधले लक्ष
भुसावळ : श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात नवरात्रीचे औचित्य साधून युवती सभा व साडी डे चे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ.रवीकांत परदेशी होते. डॉ.रवीकांत जी परदेशी यांनी मुलींना आपल्या आहारात एबीसीडी विटामि चा समावेश करत आपले आरोग्य उत्तम राखावे त्यासाठी कोणती काळजी घ्यावी यासाठी मोलाचा वैद्यकीय सल्ला दिला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश जोशी यांनी मुलींनी आपल्या आरोग्य रक्षणार्थ नियमित संतुलित आहार घेतलाच पाहिजे, असे सांगत सुविधांची माहिती दिली.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
डॉ.पूनम त्रिवेदी व प्रा.ज्योती ओस्तवाल यांनी विद्यार्थिनींना आपली सुरक्षितता व स्वच्छता कशी राखावी, स्वास्थ्य सौंदर्य संवर्धनासाठी आवश्यक ती माहिती दिली. डॉ.सुधीर शर्मा, डॉ.विवेक जोशी, प्रा.किशोर चौधरी, प्रा.शीबा खान, प्रा.समता तायडे, सर्व प्राध्यापक उपस्थित होते. डॉ.पूनम त्रिवेदी व प्रा.ज्योती ओस्तवाल यांनी परीश्रम घेतले.

