Rape of young woman in Yawal taluka : Forced abortion यावल तालुक्यातील तरुणीवर बलात्कार : जबरदस्तीने केला गर्भपात
Rape of young woman in Yawal taluka : Forced abortion यावल : तालुक्यातील एका गावातील 22 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वर्षभर शारीरीक संबंध निर्माण करण्यात आले व नंतर तरुणीचा जबरदस्तीने गर्भपात करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. या प्रकरणी तरुणीने यावल पोलिसात तक्रार दिल्यावरून तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी निलेश पंढरीनाथ पाटील या तरुणाला यावल पोलिसांनी अटक केली आहे.
वर्षभर केला अत्याचार
22 वर्षीय पीडीत तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार 2021 ते जुन 2022 पावेतो वेळोवेळी संशयीत आरोपी निलेश पाटील याने पीडीत तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी आजीच्या राहते घरी तसेच संशयीत आरोपी निलेश याच्या मालकीच्या खळ्यामध्ये शारीरीक संबंध ठेवल्यानंतर पीडीता गर्भवती राहिली. यानंतर निलेश याने पीडीत तरुणीच्या इच्छेविरुध्द गोळ्या-औषधी देऊन तीचा जबरदस्तीने गर्भपात केला. या प्रकरणी शनिवार, 8 ऑक्टोंबर रोजी बलात्कार, अॅट्रासिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे करीत आहेत.

