अल्पवयीन तरुणीला पळवून अत्याचार करणारा आरोपी जाळ्यात

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी ; आरोपी सावदा पोलिसांच्या ताब्यात
जळगाव : अल्पवयीन तरुणीला फूस लावून पळवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी सावदा पोलिसात दाखल गुन्ह्यातील संशयीत आरोपी महेंद्रसिंग फुथ्या भिलाला (40, जामन्या ढाबा, ता.खकनार, जि.बर्हाणपूर) यास सोमवारी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. ही कारवाई जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी.जी.रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, मनोज दुसाने, प्रवीण हिवराळे, किरण धनगर, दीपक पाटील आदींच्या पथकाने केली.




