अखेर धरणगावातील वादग्रस्त अतिक्रमण प्रशासनाने हटवले : शहरात 48 तास कर्फ्यू ; आता सोशल मिडीयावर पोलिसांची नजर
Finally, the controversial encroachment in Dharangaon was removed by the administration: 48 hours curfew in the city; Now the eyes of the police on social media धरणगाव : शहरातील वादग्रस्त अतिक्रमण हटवल्यानंतर पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त लावला असून सोशल मिडीयावरही करडी नजर ठेवण्यात आली आहे. गुरुवारचा आठवडे बाजारही यानिमित्त रद्द करण्यात आला आहे. धरणगाव शहरालगत असलेल्या गट नं. 1248/2 मधील वादग्रस्त अतिक्रमण बुधवारी बंदोबस्तात हटवण्यात आल्यानंतर खबरदारी म्हणून बुधवारी रात्री आठ ते शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कर्फ्यू लावण्यात आला असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. याबाबतचे आदेश प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी काढले आहेत.
जिल्हाधिकार्यांनी काढले होते आदेश
गायरान बचाव मंचच्या वतीने धरणगाव येथील गट क्र 1248 व गट नं 1248/9 या गायरानासाठी आरक्षित शासकिय जागेवर मानवसेवा संकल्प प्रतिष्ठाण, मुंबई यांनी केलेले अतिक्रमण काढण्यात यावेत, अशी तक्रार केली होती. त्यावर जळगाव जिल्हाधिकारी यांनी तत्काळ अतिक्रमण काढण्याबाबतचे आदेश काढले होते. त्यानंतर हेच आदेश नाशिक आयुक्तांनी कायम ठेवले होते. त्यामुळे बुधवारी सकाळी धरणगाव पोलिसांनी शांतता कमेटीची बैठक आयोजित केली. या बैठकीत शहरातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.


सामाजिक एकोपा जपण्याचे आवाहन
यावेळी पोलीस अधिकारी तथा महसूलच्या अधिकार्यांनी गावात सामाजिक एकोपा जपण्याचे आवाहन केले तसेच वादग्रस्त परिसरात कलम 144 लागू केले असल्याचे जाहीर केले. संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया समजावून सांगितली. धरणगावकरांनी घेतली सामंजस्याची भूमिका घेतल्यामुळे त्याच ठिकाणी वातारवण निवळले होते. परंतू खबरदारी म्हणून सायंकाळी संपूर्ण शहरात दोन दिवसा साठी कर्फ्यू अर्थात संचारबंदी लावण्यात आली. याबाबतचे आदेश प्रांधिकारी विनय गोसावी यांनी काढले आहेत.
शहरातील मुख्य भागात कडक बंदोबस्त !
शहरातील मुख्य भागात पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला असून त्यात 100 पोलीस कर्मचारी, 20 महिला कर्मचारी, 4 आरसीपी प्लाटून, 10 पोलिस अधिकारी आणि 2 डीवायएसपी दर्जाचे अधिकारी यांचा समावेश होता.
संवेदनशील विषयाची धरणगाव पोलिसांकडून उत्कृष्ट हाताळणी !
अतिक्रमण हटविण्याबाबत गावात काही दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. जिल्हाधिकारी अमन मित्तल, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी धरणगावला भेट देत परीस्थितीचा आढावा घेतला होता. प्रांताधिकारी विनय गोसावी, चाळीसगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी ऋषिकेश रावले, पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी संवेदनशील विषयाची उत्कृष्ट हाताळणी केल्यामुळे गावात सगळीकडे शांतता होती.
गावासह सोशल मीडियातही आवाहन
प्रशासनाने संचारबंदी लागू केल्यानंतर सोशल मीडियात आदेशाची प्रत व्हायरल करण्यात आली आहे तसेच एक ऑडीओ क्लिपदेखील टाकण्यात आली आहे. दरम्यान, अफवा पसरविणार्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा ईशारा देखील पोलिसांकडून देण्यात आला आहे. दरम्यान, गावात संचारबंदी बाबत दवंडीदेखील देण्यात आली आहे.