माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले : कामाला लागा, कोणत्याही क्षणी निवडणुका


Former Chief Minister Uddhav Thackeray said : Get to work, elections at any moment

मुंबई : राज्यात मध्याचती निवडणुका कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्तवली आहे. मुंबईतील दादरमधील शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंनी राज्यभरातील संपर्कप्रमुखांसोबत बैठक घेतल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादीनेही मध्यावती निवडणुकांचे सूचक संकेत दिले आहेत. दरम्यान, ठाकरेंचा दावा फोल ठरवत उरलेले कार्यकर्ते टिकवून ठेवण्यासाठी हे विधान असल्याचे शिंदे गटातील नेते नरेंद्र म्हस्के यांनी म्हटले आहे.



राष्ट्रवादीच्या दाव्याचीही चर्चा
शिर्डी येथे झालेल्या मंथन शिबिरामध्ये बोलत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही मोठा दावा केला आहे. शिर्डीत काँग्रेसचे शिबीर झाले आणि सरकार पडले होते तर आता राष्ट्रवादीचे शिबिर झाल्यानंतरही एकनाथ शिंदेंचे सरकार पडायला पुढे आले आहे, असा दावाच पाटील यांनी केला आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !