भुसावळातील मुस्लीम कॉलनीत धाडसी घरफोडी ; अडीच लाखांचा ऐवज लंपास
Daring burglary in Muslim colony in Bhusawal ; Lumpas instead of two and a half lakhs भुसावळ : शहरातील खडका रोडवरील मुस्लीम कॉलनीतील रहिवासी इरफान शहा इस्माईल शहा फकिर हे मुंबई येथे गेले असल्याने बंद घराला लक्ष्य करीत चोरट्यांनी 3 ते 7 जानेवारी या काळात घराचे कुलूप तोडून घरात ठेवलेली रोख रक्कम 1 लाख 60 हजार रूपये आणि सोन्या चांदीचे दागिणे मिळून 2 लाख 63 हजार 800 रूपयांचा ऐवज लांबविल्याची घटना शनिवारी पहाटे चारला उघडकीस आली. यामुळे मुस्लीम कॉलनीत खळबळ उडाली आहे.
बंद घरे चोरट्यांना पर्वणी
शहरातील खडका रोड भागातील मुस्लीम कॉलनीत राहणारे इरफान शहा हे कामानिमीट मुंबई येथे दि. 3 जानेवारीला गेले होते. ते मुंबई येथून परत शनिवार, 7 रोजी पहाटे चार वाजता परत आले. त्यावेळी घराचे कंपाउंडचे गेट उघडे दिसले. आतील दरवाजाजवळ जाऊन पाहीले असता, आतील दरवाजाचे कुलूप सुध्दा तुटलेले दिसले. घरात आत जाऊन पहाणी केली असता. घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले होते. किचनमध्येअसलेले दोन्ही कपाटे उघडी होती, त्यांंचे लॉक तोडलेले होते. त्यातील एका कपाटात बहिण शाहिन बी इस्माईल शहा हिचे सोन्याचे दागिणे व रोख रक्कम ठेवलेली होती.ती चोरट्यांनी लांबवली. दुसर्या कपाटात आई राबीया यांचे दागिणे ठेवलेले होते. दोन्ही कपाटातील दागिणे व रोख रक्कम चोरट्यांनी लांबविले. चोरट्यांनी दोन्ही कपाटातील साहित्य व दागिणे लांबविले. कपडे लांबविले. गॅरेजसाठीलागणार्या पान्ह्यांचे टुलबॉक्स लांबविले. याप्रकरणी इरफान शहा यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.


अधिकार्यांकडून पहाणी
घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह अन्य अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. दरवाजाचे कुलूप तोडण्याची पध्दत पाहीली. याबाबत परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरे कुठे आहे, त्याचे पाच दिवसांचे फुटेज पहाणी सुरू केली आहे.
असे चोरीला गेले साहित्य
1 लाख 60 हजार रूपये रोख, 30 हजार रूपयांचे 10 ग्रॅम वजानाची सोन्याची पोत, त्यात पाच ग्रॅम वजनाचे पेंडल, 18 हजार रूपये वजनाचे सहा ग्रॅम वजनाचे कानातील टोंगल, 12 हजार रूपये किंमतीचे 3 ग्रॅम वजनाचे कानातील चाफे, 15 हजार रूपये किमंतीच्या 5 ग्रॅम वजनाच्या कानातील बुगड्या, 18 हजार रूपयांचे पेंडल, 4 हजार रूपये किंमतीचे 10 भाराचे ब्रेसलेट, 1 हजार 600 रूपयांचे पायातील पैजण, 3 हजार रूपयांची लोखंडी पेटी त्यात गॅरेज कामाचे लोखंडी पान्हे (टुलबॉक्स) 1 हजार रूपयांची लोखंडी पेटी त्यात कपडे, 1 हजार 200 घराचे सहा लोखंडी पत्रे असा 2 लाख 63 हजार 800 रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरीला गेला.
