मांजर्डीच्या 30 वर्षीय युवकाची शेतात आत्महत्या


A 30-year-old youth of Manjardi committed suicide in the field अमळनेर :  अमळनेर तालुक्यातील मांजर्डी येथील 30 वर्षीय युवकाने शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. शनिवार, 7 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुकदेव शिवाजी भील (30, मांजर्डी) असे मृत तरूणाचे नाव आहे. आत्महत्या करण्याचे नेमके कारण समजू शकले नाही.

आत्महत्या करण्याचे कारण अस्पष्ट
सुकदेव भील हे आपल्या परीवारासह वास्तव्याला होते व शेती करून आपल्या परीवाराचा उदरनिर्वाह करीत होेा. सुकदेव याने शनिवारी भटू आत्माराम पाटील यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. भटू पाटील हे दुपारी एक वाजता शेतात पाणी भरण्यासाठी गेले तेव्हा त्यांना सुकदेव भील याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी गावातील व शेतातील नागरीकांना बोलावून घेतले. खाली उतरवून तातडीने अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी शनिवार, 7 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार संदेश पाटील करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !