मराठा विद्या प्रसारक संस्थेतील वाद : संजय पाटील यांना अटक


जळगाव : मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या ताब्यावरून झालेल्या वादात दोघा गटातील समर्थकांमध्ये तुफान हाणामारी व दगडफेक झाली होती. या गुन्ह्यातील संजय भास्कर पाटील यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी दीक्षितवाडी येथील राहत्या घरातून अटक केल्याने खळबळ उडाली आहे.

दोन गटात झाली होती दगडफेक
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेवरील ताब्यावरून पाटील व भोईटे गटात-तीन चार वर्षांपासून वाद सुरू आहे. जुन-2018 मध्ये संस्थेच्या ताब्यावरुन पोलिसांनी दोघा गटांना संस्थेच्या कार्यालयात जाण्यास मज्जाव केला होता. तेव्हापासून हे प्रकरण चांगलेच चिघळले होते. दरम्यान, तत्कालिन तहसीलदार निकम यांनी दिलेल्या आदेशावरून पाटील गटाने संस्थेतील कार्यालयातील ताबा घेत कामकाज सुरू होते होते. यावरून भोईटे गटाने 19 जुन 2018 रोजी भोईट गटाने आक्षेप घेत नुतन मराठा महाविद्यालयासमोर दोन्ही गटांचे समर्थक समोरासमोर भिडले होते. यात हाणामारी आणि दगडफेक करण्यात आली होती. या प्रकरणी सुनिल धोंडू भोईट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात 97/2018 प्रमाणे भादंवि कलम 307, 304, 143, 147, 149 प्रमाणे एकुण 17 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.



अखेरच्या संशयीत आरोपीला बेड्या
या 17 आरोपींपैकी 12 जणांना अटक करण्यात आली होती. तर उर्वरित पाच संशयितांपैकी बापू चव्हाण आणि चंद्रकांत पाटील घटनेच्या वेळी नसल्याचे निष्पन्न व तफावत असल्याने त्यांना अटक करण्यात आली नव्हती तर पियुष नरेंद्र पाटील आणि भूषण पाटील हे त्यादिवशी बाहेरगावी असल्याने त्यांची नावे वगळण्यात आली. या गुन्ह्यातील शेवटचा संशयीत आरोपी संजय भास्कर पाटील यांना रविवारी दुपारी 12 वाजता स्थानिक गुन्हे शाखा आणि जिल्हा पेठ पोलिसांनी अटक केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !