दुकान फोडणारा संशयीत जिल्हापेठ पोलिसांच्या जाळ्यात
A shop in Chitra Chowk, Jalgaon was broken into : Suspects in police net जळगाव : जळगाव जिल्हा पेठ पोलिसांनी दुकानातील चोरी प्रकरणी संशयीताला अटक करीत त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. जळगावच्या चित्रा चौकातील शर्मा बिल्डिंगमधील जय लहरी ट्रेडर्स दुकानातून 73 हजारांचा मुद्देमाल लांबवल्याप्रकरणी रविवारी दुपारी 12 वाजता भिलवाडी परीसरातून दोन अल्पवयीनांसह एकाला अटक करण्यात आली असून चोरीच्या मुद्देमालासह दुचाकी जप्त करण्यात आली.
चोरट्यांची छबी सीसीटीव्हीत कैद
हेमंत नंदलाल रंगलानी (50, साने गुरुजी कॉलनीच्या मागे, टेलीफोन नगर, जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. त्यांचे चित्रा चौकातील शर्मा बिल्डिंग येथे जय लहरी ट्रेडर्स नावाचे शेतीला लागणारे इलेक्ट्रिक मोटार यांचे दुकान फोडून सुमारे 73 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. चोरी करतांना तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले होते. याप्रकरणी सोमवार, 2 जानेवारी रोजी सायंकाळी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


गोपनीय माहितीवरून करवाई
जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख, सलीम तडवी, गणेश पाटील, जुबेर तडवी, समाधान पाटील, अमित मराठे, नरेंद्र दिवेकर, केतन सुर्यवंशी अशांनी रविवार, 8 जानेवारी रोजी कारवाई करत दुपारी 12 वाजता संशयीत आरोपी विशाल उर्फ स्टीन युवराज सोनवणे (पावर हाऊस, भिलवाडी जळगाव) याला त्याच्या राहत्या परिसरातून अटक केली आहे. इतर दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली त्याने दिली आहे. चोरीला गेलेला 73 हजार रूपयांचे मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (एमएच 19 सीजी 6105) असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास हवालदार गणेश पाटील करीत आहे.
