शेंदुर्णीत जिनिंगला आग : 35 लाखांचे नुकसान
Fire at Jining in Shendurni : Loss of 35 lakhs शेंदुर्णी, ता.जामनेर : शहरातील नर्मदा कॉटन इंडस्ट्रीज जिनिंगला अचानक लागलेल्या आगीत सुमारे 35 लाखांची कपाशीची रुई जळून खाक झाली. या प्रकरणी पहूर पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.
पहूर पोलिसात आगीची नोंद
शेंदुर्णी येथील गट नंबर 520 / 2 / 2 कृष्णा उद्योग/ नर्मदा कॉटन इंडस्ट्रिज जिनिंगच्या गोडावूनला 7 रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अचानक इलेक्ट्रीक शॉर्ट सर्कीट झाल्यामुळे आग लागली. यात दोन्ही गोडावूनमध्ये असलेली अंदाजे 190 क्विंटल वजनाची कपाशीची रुई जळाल्याने अंदाजे 30 ते 35 लाख रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी दीपक रामचंद्र अग्रवाल यांच्या खबरीवरून अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार प्रशांत विरनारे करीत आहेत.


