ब्लॅकमेलिंगला कंटाळून विवाहितेची मुलीसह आत्महत्या : एकाविरोधात गुन्हा


Suicide of married woman with daughter after getting tired of blackmailing : Crime Against One अमळनेर : तालुक्यातील एका गावातील विवाहितेने आपल्या मुलीसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. शारीरीक संंबंध ठेवण्यास दिलेला नकार व सोन्याची बाही परत न केल्याने त्यास कंटाळून विवाहितेने टोकाचे पाऊ उचलल्यानंतर मयताच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अशोक गटलू कोळी (अमळनेर तालुका) याच्याविरोधात मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतात केली आत्महत्या
कळमसरे-नीम रस्त्यावरील सबस्टेशनजवळ भाकचंद जैन यांच्या शेतातील विहिरीत 4 ऑक्टोबर 2022 रोजी अमळनेर तालुक्यातील एका गावातील ील विवाहितेने आठ वर्षीय मुलीसह आत्महत्या केली होती. या घटनेनंतर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली होती. या प्रकरणी तीन महिन्यानंतर अशोक गटळू कोळी (अमळनेर तालुका) याच्याविरुद्ध विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.



ब्लॅकमेलिंगला कंटाळून केली आत्महत्या
या प्रकरणी मयत विवाहीतेच्या पतीने यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्याच्या पत्नीने अशोक कोळी यास कानातील पाच ग्रॅमची सोन्याची बाही दिली होती. ती बाही अशोकने परत केली नाही तसेच पत्नीने अशोक याच्यासोबत शारीरीक संबंध ठेवण्यास नकार दिला म्हणून अशोक हा त्याच्याकडे असलेले दोघांचे फोटो व व्हाईस रेकॉर्डिंग गावात पसरवून बदनामी करण्याची वारंवार धमकी देत होता. या त्रासाला कंटाळून आपल्या पत्नीने मुलीसोबत आत्महत्या केली होती, असे फिर्यादीत म्हटले आहे. तीन महिन्यानंतर8 जानेवारी 2023 रोजी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बाळकृष्ण शिंदे करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !