जळगावच्या विवाहितेचा छळ : पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा


Harassment of married woman of Jalgaon : Crime against husband and father-in-law जळगाव : जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीतील माहेर असलेल्या विवाहितेला कारण नतांना टोचून बोलून शारिरीक व मानसिक छळ करण्यात आला. छळ असह्य झाल्याने विवाहितेने तक्रार दिल्यानंतर रविवार, 8 जानेवारी रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

छळ झाला असह्य
शहरातील सुप्रिम कॉलनी येथील माहेर असलेल्या नजरीन अशपाक पिंजारी (20) यांचा विवाह जळगाव तालुक्यातील आसोदा येथील अशपाक युनूस पिंजारी यांच्याशी जुलै 2021 मध्ये रितीरिवाजानुसार झाला. लग्नाच्या काही दिवसातच पतीकडून विवाहितेला काहीही कारण नसतांना टोचून बोलणे सुरू केले. त्यानंतर शिवीगाळ आणि मारहाण देखील केली. शिवाय सासू, सासरे, जेठ, आते सासू यांनी देखील गांजपाठ केला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी सुप्रिम कॉलनीत निघून आल्या.



हे आहेत संशयीत आरोपी
रविवार, 8 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता विवाहितेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती अशपाक युनूस पिंजारी, सासरे युनूस इसामू पिंजारी, सासू परविनबी युनूस पिंजारी, जेठ शहरूख युनूस पिंजारी आणि आते सासू जमिलाबी ईसाक पिंजारी (सर्व रा.आसोदा, ता.जळगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार महेंद्रसिंग पाटील करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !