भुसावळातून चोरट्यांनी महागडा दोन लाखांचा मोबाईल लांबवला


Thieves stole an expensive mobile worth two lakhs from Bhusawal भुसावळ : शहरातील आठवडे बाजारातील किराणा दुकानाच्या काऊंटरवरून अज्ञात चोरट्यांनी दोन लाखांचा मोबाईल लांबवल्याची घटना 8 रोजी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

काऊंटरवरून लांबवला मोबाईल
शिवाजी ओंकार सोनवणे (30, सत्यसाईनगर, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, आठवडे बाजारातील लक्ष्मी किराणा दुकानाच्या काऊंटरवर अज्ञात स्त्री-पुरूष आल्यानंतर त्यांनी हातचलाखीने एक लाख 95 हजार रुपये किंमतीचा मोबाईल लंपास केला. तपास नाईक निलेश चौधरी करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !