बोरावल खुर्द येथे आजाराला कंटाळून 80 वर्षीय वृध्दाची आत्महत्या
An 80-year-old man committed suicide due to illness at Boraval Khurd यावल : तालुक्यातील बोरावल खुर्द येथे आजाराला कंटाळून एका 80 वर्षीय वृद्धाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी सायंकाळी निदर्शनास आला. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
दुर्धर आजारामुळे टोकाचा निर्णय
बोरावल खुर्द, ता.यावल येथील रहिवासी भावरत बुधा मोरे (80) हे गेल्या काही महिन्यांपासून दुर्धर आजाराने त्रस्त होते. दरम्यान सोमवारी ते आपल्या राहत्या घरात असताना त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार हा सायंकाळी निदर्शनास आला. यावल पोलिसांना माहिती देण्यात आली व मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन देशमुख यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना सोपवला. या प्रकरणी महेश मोरे यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालादार योगेश खडके करीत आहे.


