अल्पवयीन मुलीला अज्ञाताने पळवले : शिरसोली गावातील प्रकार


Minor girl abducted by unknown person : Shirsoli village case जळगाव : जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील अल्पवयीन मुलीला अज्ञाताने आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. या प्रकरणी सोमवार, 9 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

फूस लावून पळवले
जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. शनिवार, 7 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता अल्पवयीन मुलगी ही घरी एकटी असतांना गावातील अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. मुलीच्या नातेवाईकांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला परंतू मुलगी कुठेही मिळून आली नाही. अखेर सोमवार, 9 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर अज्ञाताविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक अमोल मोरे करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !