सोयगावातील हवालदारास मारहाण : त्रिकूटाविरोधात जळगावात गुन्हा


Beating up constable in Soygaon : Crime against Trikota in Jalgaon जळगाव : सोयगाव पोलिस ठाण्यात नियुक्तीस असलेल्या हवालदारासह त्याच्या मित्राला मारहाण केल्याप्रकरणी त्रिकूटाविरोधात जळगावच्या एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी एकाच्या मुसक्या पोलिसांनी बांधल्या आहेत. सुनील सुभाष साळवे (पळासखेडा, ता.सोयगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

कारण नसताना केली मारहाण
सोयगाव पोलिस ठाण्यात मिर्झा मोहम्मद इसराल हिमायू बेग (38, जामनेर), हे कार्यरत आहेत. सोमवार, 9 जानेवारी मिर्झा बेग हे त्यांचे मित्र सलीम शेख (जामनेर) यांच्यासोबत दुचाकीने जळगावात खाजगी कामासाठी आल्यानंतर दुचाकीने मित्रासोबत जामनेरकडे निघाले असता कुसुंबा गावातील रॉकेश हॉटेलमध्ये सायंकाळी 5.30 वाजता जेवण करण्यासाठी थांबले. त्यावेळी हॉटेलात तीन जणांनी त्यांचा मित्र सलीम शेख याला काहीही कारण नसतांना मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी मिर्झा बेग हे गेले असता त्यांना देखील मारहाण केली.



सीसीटीव्हीद्वारे संशयीत निष्पन्न
पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या आधारे तिघांची नावे निष्पन्न केल्यानंतर संशयीत आकाश विश्वे (सुप्रीम कॉलनी), सुनील सुभाष साळवे (पळासखेडा, ता.सोयगाव) व सुनील सोनार (पूर्ण नाव माहिती नाही) या तिघांविरोधात सोमवारी रात्री 10 वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी सुनील सुभाष साळवे याला मंगळवारी सकाळी आठ वाजता अटक करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !